मणिपूरवर बोलणाऱ्या अण्णा हजारे यांना संजय राऊत यांचं आवाहन; म्हणाले…
मणिपूरमधील घटनेवरून समाजसेवक अण्णा हजारेंनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.
मुंबई, 23 जुलै 2023 | मणिपूरमध्ये दोन महिलांची निर्वस्त्र धिंड काढण्यात आली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. यावर समाजसेवक अण्णा हजारेंनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, “गेले काही दिवस अण्णा बोलतील, अशी मागणी करत होतो. मात्र, अण्णांनी थेट मणिपूरच्या विषयाला हात घातला. देशात अशा प्रकारच्या अनेक घटना घडत आहेत. पण, अण्णांची ओळख भ्रष्टाचार विरोधी म्हणून आहे. महाराष्ट्रात भाजपाने पुराव्यासह ज्यांच्यावर आरोप केले, ते….” , संजय राऊत नेमकं काय म्हणाले यासाठी हा व्हिडीओे पाहा…
Published on: Jul 23, 2023 11:37 AM