Special Report | संजय राऊतांची रवानगी आर्थर जेलमध्ये!

| Updated on: Aug 08, 2022 | 9:23 PM

आमदार नवाब मलिक गेल्या काही महिन्यांपासून आर्थर रोड तुरुंगातच आहेत, या दोघांनंतर आता खासदार संजय राऊतही आर्थर रोडमध्ये गेल्याने आता देशमुख-मलिकांप्रमाणेच कित्येक दिवस आर्थर रोडमध्ये घालवावे लागणार की काय असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. 

शिवसेनेच खासदार संजय राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, त्यामुळे आता अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्याप्रमाणेच संजय राऊत यांनाही जामिनासाठी वाट पाहावी लागणार नाही. संजय राऊत यांना भेटण्यासाठी आज त्यांचे भाऊ गेले असताना संजय राऊत यांनी त्यांना आपल्या आईची चौकशी केली, त्याचबरोबर आपणच जिंकणार असल्याचा विश्वास देऊन तुम्ही आईची काळजी घ्या असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. राष्ट्रवादीच अनिल देशमुख, माजी मंत्री आणि आमदार नवाब मलिक गेल्या काही महिन्यांपासून आर्थर रोड तुरुंगातच आहेत, या दोघांनंतर आता खासदार संजय राऊतही आर्थर रोडमध्ये गेल्याने आता देशमुख-मलिकांप्रमाणेच कित्येक दिवस आर्थर रोडमध्ये घालवावे लागणार की काय असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

Published on: Aug 08, 2022 09:23 PM
Special Report | मंत्रिमंडळाचा विस्ताराचा मुहूर्त ठरला
Special Report | मुलांचा टीईटी घोटाळा, अब्दुल सत्तारांची मंत्रिपदाची संधी हुकणार