केसीआर यांचा पंढरपूर दौरा, संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा!

| Updated on: Jun 28, 2023 | 3:21 PM

तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव हे दोन दिवसाच्या पंढरपूर दौऱ्यावर होते. याच दौऱ्यात त्यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते भगिरथ भालके यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.

मुंबई: तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव हे दोन दिवसाच्या पंढरपूर दौऱ्यावर होते. याच दौऱ्यात त्यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते भगिरथ भालके यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. “तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची वकिली चंद्रशेखर बावनकुळे केव्हापासून करायला लागलेत. त्यांनी स्वत: च्या पक्षाकडे लक्ष द्यावं. मी फक्त एवढंच म्हटलं की भाजपानं महाराष्ट्रात निवडणुका जिंकण्यासाठी किती बी टीम, सी टीम बनवून ठेवल्या आहेत. आता ही नवीन टीम बनवली आहे. 2019ला त्यांनी एमआयएमला बी टीम बनवलं होतं. कधी आणखी कुणाला करतात. नंतर काम झालं, की रात गई, बात गई. आता त्यांनी केसीआर साहेबांना बोलवलं आहे. पण महाविकास आघाडी प्रत्येक लढाईसाठी समर्थ आहे, आम्ही लढाई लढू आणि जिंकू. केसीआर यांनी तेलंगणातील लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी निर्णय घ्यावेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं हित पाहण्यासाठी इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांना इथं येण्याची गरज नाही,” असं राऊत म्हणाले.

Published on: Jun 28, 2023 03:21 PM
‘वांद्रे-वर्सोवा सी लिंक’ ‘शिवडी न्हावा शेवा सी लिंक’ आता या नावानं ओळखलं जाणार; राज्य शासनाने घेतला मोठा निर्णय
‘राऊत यांना ब्लॅकमेल करण्यासाठीच सगळ्या यंत्रणाचा केंद्रासह राज्याकडून वापर’; शिवसेना नेत्याचा हल्लाबोल