“देश बुडव्यांच्या हाती महाराष्ट्र, राज्य सरकार बरखास्त करा”, संजय राऊत यांची टीका
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना यांना ओपन चॅलेंजही दिलं आहे. ते म्हणाले की, तुमची असेल नसेल तेवढी सगळी सत्ता वापरा. तपास करा. सखोल चौकशी करा काही निष्पन्न झालं तर अटक करा, आमचा तुम्हाला पाठिंबा राहील." शरद पवार यांच्या या विधानाला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी समर्थन दिलं आहे.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना यांना ओपन चॅलेंजही दिलं आहे. ते म्हणाले की, माझं जाहीरपणे पंतप्रधानांना सांगणं आहे, आमच्यापैकी कुणी भ्रष्टाचारात सहभागी झाला असं तुम्हाला वाटत असेल तर, तुमची असेल नसेल तेवढी सगळी सत्ता वापरा. तपास करा. सखोल चौकशी करा आमचा तुम्हाला पाठिंबा राहील.” शरद पवार यांच्या या विधानाला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी समर्थन दिलं आहे. ते म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्याची चौकशी झाली पाहिजे. शरद पवार यांनी तीच मागणी केली आहे. आम्ही पवारांच्या या भूमिकेशी सहमत आहोत. राष्ट्रवादीने भ्रष्टाचार केला असेल, जो मंत्री भ्रष्टाचारी आहे त्याची चौकशी झालीच पाहिजे. सेंट्रल एजन्सी आणि स्टेट एजन्सीकडून या भ्रष्टाचाराची चौकशी केली पाहिजे, असं सांगतानाच देश बुडव्यांच्या हाती महाराष्ट्र गेल्याने राज्य सरकार बरखास्त करा.”