दोन ठग आहेत कुठे? Sanjay Raut यांचा सवाल

| Updated on: Apr 11, 2022 | 10:46 AM

भाजप नेते किरीट सोमय्यांना (kirit somaiya) अटक होऊ नये म्हणून त्यांच्या माफिया टोळीचे प्रयत्न सुरू आहेत. कालपासून राजभवनात (raj bhavan) सोमय्यांच्या माफिया टोळीचे लोक जात आहेत. जुन्या तारखेचे कागदपत्रं तयार करत आहे. मी राजभवनाला इशारा देतो.

भाजप नेते किरीट सोमय्यांना (kirit somaiya) अटक होऊ नये म्हणून त्यांच्या माफिया टोळीचे प्रयत्न सुरू आहेत. कालपासून राजभवनात (raj bhavan) सोमय्यांच्या माफिया टोळीचे लोक जात आहेत. जुन्या तारखेचे कागदपत्रं तयार करत आहे. मी राजभवनाला इशारा देतो. राजभवनाने या भानगडीत पडू नये. देशविरोधी कृत्यात सामील होऊ नये. अन्यथा राजभवनाची इभ्रतही जाईल, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिला. सोमय्या आणि त्यांच्या टोळीने लोकांची फसवणूक केली आहे. त्यांनी केलेला हा घोटाळा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही. त्याची व्याप्ती मोठी आहे. राज्याबाहेरही या घोटाळ्याचं लोण आहे. त्यामुळे हे दोन्ही लफंगे बापबेटे लपून बसले आहेत. अंतरीम जामीन मिळवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. केंद्रातून सेटिंग करत आहेत. मात्र, त्यांना जामीन मिळणार नाही, असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी मीडियशी संवाद साधताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना हा इशारा दिला आहे. एक माफिया गँग आता बोगस पुरावे तयार करत आहे. मी राजभवनाला इशारा देतो जर चुकीचं काम केलं तर राजभवनाची उरलेली इभ्रतही संपेल. सोमय्यांना वाचवण्याचे खूप प्रयत्न होत आहेत. पण गुन्हेगार कुठेही असो मुंबई पोलीस त्यांना पकडणारच, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.

Published on: Apr 11, 2022 10:46 AM
‘BJPने Gunaratna Sadavarte सारख्या माकडाच्या हातात कोलीत देऊ नये’; सामनामधून Sanjay Raut यांची टीका
कोकणात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता, हवामान खात्याने व्यक्त केला आहे अंदाज