…त्यांच्यावर कारवाई होईल

| Updated on: Jul 18, 2022 | 8:17 PM

ज्या बंडखोर आमदारांवर याचिका दाखल केली आहे त्यांच्यावर कारवाई ही होणार आहेच, मात्र त्यामध्ये पहिली कारवाई ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच होणार असल्याचे सांगत त्यांचे मुख्यमंत्री पदचहे घटनाबाह्य असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची आज दिल्लीत पत्रकार परिषदे झाली त्यावेळी संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर गटावर राऊत स्टाईलने तोफ डागत त्यांना शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त करण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी सांगितले की, शिंदे गटाचा जो काही प्रकार चालू आहे तो कॉमेडी एक्सप्रेस सीझन टू चालू असल्याचे सांगत पहिला भाग हा महाराष्ट्रातील विधीमंडळात घडला असून आता दुसरा भाग हा लोकसभेत चालू असल्याचे त्यांनी सांगितले. बंडखोर आमदारांबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यातील ज्या बंडखोर आमदारांवर याचिका दाखल केली आहे त्यांच्यावर कारवाई ही होणार आहेच, मात्र त्यामध्ये पहिली कारवाई ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच होणार असल्याचे सांगत त्यांचे मुख्यमंत्री पदचहे घटनाबाह्य असल्याचे त्यांनी सांगितले.

Published on: Jul 18, 2022 08:17 PM
ज्या पक्षाचे सरकार त्या पक्षाचा राष्ट्रपती
शिंदे-शिवसेने गटातील आमदार आमने-सामने