शिवसेनेसारखीच राष्ट्रवादीत फूट, “2 घटनाबाह्य टेकूंवर सरकार उभं”, संजय राऊत यांचा टोला
राष्ट्रवादीतील फूटीनंतर महाविकास आघाडी अस्वस्थ झाल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काल शरद पवार यांची वायबी चव्हाण सेंटरला जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर संजय राऊत यांनी माध्यमाशी चर्चा करताना भाजपवर टीका केली आहे.
मुंबई : राष्ट्रवादीतील फूटीनंतर महाविकास आघाडी अस्वस्थ झाल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काल शरद पवार यांची वायबी चव्हाण सेंटरला जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर संजय राऊत यांनी माध्यमाशी चर्चा करताना भाजपवर टीका केली आहे. “जो प्रसंग शिवसेनेवर आला आहे, त्याच प्रसंगातून राष्ट्रवादी देखील जात आहे. पण आम्ही मविआ म्हणून एकत्र आहोत. खासदार, आमदार फोडले, कार्यालय देखील त्यांना दिली. पण आम्ही डममगणार नाही. उद्धव ठाकरे यांच्यासारखा प्रतिसाद शरद पवार आणि राहुल गांधी यांनी मिळत आहे. भाजप हा देशातला सर्व भ्रष्ट पक्ष आहे. महाविकास आघाडी बँनरखाली आम्ही सगळे एकत्र आहोत. दोन घटनाबाह्य टेंकूवर सरकार उभं आहे,” असं राऊत म्हणाले.
Published on: Jul 05, 2023 11:42 AM