“आजचं सरकार इतिहास नष्ट करतंय”, संजय राऊत यांचा हल्लाबोल

| Updated on: Jun 04, 2023 | 12:07 PM

नव्या संसद भवनावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. "वीर सावरकर, महात्मा गांधी इतिहास आहे. आपला हा इतिहास आजचे सरकार नष्ट करू पाहतंय. या सरकारला असे वाटतंय की, हा देश 2014 नंतर निर्माण झाला. तोपर्यंत हा देशच नव्हता.

नाशिक : नव्या संसद भवनावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. “वीर सावरकर, महात्मा गांधी इतिहास आहे. आपला हा इतिहास आजचे सरकार नष्ट करू पाहतंय. या सरकारला असे वाटतंय की, हा देश 2014 नंतर निर्माण झाला. तोपर्यंत हा देशच नव्हता. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि हा देश निर्माण झाला. देशाला स्वातंत्र्य हे 2014 नंतर मिळालं. असा अपप्रतार केला जात आहे. पण हा क्रांतिकारकांचा अपमान आहे,” असे म्हणत संजय राऊत म्हणाले. तर “नवीन संसद भवनामुळे अनेक वाद निर्माण झाले आहेत. 1927मध्ये जे संसद भवन निर्माण करण्यात आले, त्या संसद भवनाला एक इतिहास आहे. त्या संसदेत अनेक क्रांतिकार, अनेक स्वातंत्र्यवीर, घटनाकार ज्यांनी देशाची निर्मिती केली अशांचा तिथे सहवास आजही जाणवतो. आम्ही इतिहास वाचणारी माणसे आहोत. ज्या संसदेत आधी आम्ही बसायचो, तेव्हा आम्हाला तिथे असे वाटायचे की, आम्ही देखील इतिहासाचे साक्षीदार आहोत. इतिहास चालतोय आमच्यासोबत, तर, नवीन इमारतीमध्ये आम्हाला आधीच्या संसदेची भावना निर्माण होईल का? आमचा आत्मा त्या जुन्या संसदेत अडकलेला , असे संजय राऊत म्हणाले.

Published on: Jun 04, 2023 12:07 PM
अखेर ”त्या” वादावर पडदा! राऊत यांनी थेट व्यक्त केली दिलगिरी; म्हणाले, ‘तोपर्यंत मी बोलणार नाही’
दुसऱ्यांनी माझं वकीलपत्र घेऊ नये, अजित पवार यांचा कुणाला खोचक टोला?