“समान नागरी कायदा आणताय ना? आधी मणिपूरची शांत करा”, संजय राऊत यांचा केंद्रावर घणाघात

| Updated on: Jul 21, 2023 | 12:36 PM

मणिपूर येथील हिंसाचार आणि दोन महिलांची निर्वस्त्र धिंड या प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली, 21 जुलै 2023 | मणिपूर येथील हिंसाचार आणि दोन महिलांची निर्वस्त्र धिंड या प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “संसद आहे म्हणून तुम्ही पंतप्रधान आहात. मणिपूरचा विषय गंभीर आहे. त्यावर यूरोपीयन पार्लमेंटमध्ये चर्चा होते. पण मणिपूरच्या विषयावर आपल्या संसदेत चर्चा करू देत नसतील तर ही लोकशाहीसाठी धोक्याची घटना आहे. गेले 70 दिवस होत आले. मणिपूर शांत करता येत नाही. तुम्ही इथे बसून जगाचे प्रश्न सोडवत आहात. आधी मणिपूर शांत करा. मणिपूर हा देशाचा भाग आहे. मणिपूरमधील जनता देशाची नागरीक आहे. मणिपूरमधील दोन महिलांना रस्त्यावर आणून नग्न करून मारलं जातंय. ही देशातील 140 कोटी जनतेसाठी चिंतेची गोष्ट आहे. समान नागरी कायदा आणता ना? मणिपूरमधील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत करा.”

Published on: Jul 21, 2023 12:36 PM
‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’, अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वर्षा बंगल्याबाहेर झळकले बॅनर!
“अजित पवार भावी मुख्यमंत्री”, संजय राऊत यांचं मोठं विधान; म्हणाले, “शिंदे गटाने सत्य स्वीकारावं…”