पंतप्रधान मोदी यांच्या शेजारी 70 हजार कोटींचा घोटाळा आणि इक्बाल मिर्ची; संजय राऊत यांची टीका

| Updated on: Jul 19, 2023 | 12:07 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काल एनडीएची बैठक पार पडली. यावेळी मोदी यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मुंबई, 19 जुलै 2023 : काल देशात दोन बैठकींनी लक्ष वेधून घेतलं. देशातल्या विरोधकांनी मिळून बंगळुरूमध्ये बैठक घेतली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काल एनडीएची बैठक पार पडली. यावेळी मोदी यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, “तुम्ही आमच्यावर आरोप करताय. तुमच्या बाजूलाच 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा, तुमच्यामागे इक्बाल मिर्ची उभा होता. त्याचं काय? ही ढोंगं आता बंद करा.मोदी म्हणजे इंडिया नाही. भाजप म्हणजे इंडिया नाही. प्रत्येक भारतीय इंडिया आहे. संपूर्ण देश काल जमला. ते भ्रष्टाचाराचं संघटन होतं असं मोदी म्हणाले. अरे तुमच्या बाजूला 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा होता. पाठीमागे इक्बाल मिर्ची उभा होता. हे सगळे भ्रष्टाचारी बाजूला घेऊन आमच्यावर आरोप करताय? हे ढोंग बंद करा. तुमचं ढोंग सर्वांना कळतंय.”

Published on: Jul 19, 2023 12:07 PM
विरोधक सोमय्या यांच्यावरून आक्रमक; विरोधी पक्ष नेत्यांनी केली थेट ‘ही’ मागणी
‘हे शासन आहे की दुष्याशन?’ शिवसेना नेत्याचा महिला सुरक्षिततेवरून सरकारवर घणाघात