“विधानसभा अध्यक्षांमध्ये आमदार अपात्र करण्याची हिंमत नाही”; संजय राऊत यांचा हल्लाबोल
शिवसेनेतील शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्रेसंदर्भातील निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अद्याप घेतला नाही. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नवी दिल्ली, 03 ऑगस्ट 2023 | शिवसेनेतील शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्रेसंदर्भातील निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अद्याप घेतला नाही. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “16 आमदार कायद्याने अपात्र होतायत आणि त्यांना अपात्र ठरवण्याची हिंमत राहुल नार्वेकर यांच्यात दिसत नाही. विधानसभा अध्यक्ष पद हे घटनात्मक पद असलं तरी, सध्या सर्व घटनात्मक पदं ही राजकीय दबावाखाली काम करत आहेत. आमची कायदेशीर बाजू मजबूत आहे. विधानसभा अध्यक्ष ज्या अर्थी वेळ लावत आहेत त्या अर्थी कायद्यने आमदार अपात्र होत आहेत.11 तारखेला 3 महिने पूर्ण होत आहेत. कोर्टाने आधीच अध्यक्षांना निर्देश दिले आहेत. कोर्टात आम्हाला न्याय मिळेल असा वाटत आहे. आम्हाला सरन्याधीश यांच्याकडून अपेक्षा आहेत.”
Published on: Aug 03, 2023 11:27 AM