“आज फसवणुकीची जयंती, पुढच्या वर्षी फसवणुकीची पुण्यतिथी”, संजय राऊत यांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंडखोरी करून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पाडलं. यानंतर शिंदे-फडणवीस जोडीने भाजप शिवसेनेचं युतीच सरकार आणलंय आज या युतीच्या सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंडखोरी करून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पाडलं. यानंतर शिंदे-
फडणवीस जोडीने भाजप शिवसेनेचं युतीच सरकार आणलंय आज या युतीच्या सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही त्या सरकारकडे सरकार म्हणून पाहतच नाही. या सरकारला एक वर्ष झालेलं आहे. महाराष्ट्राच्या फसवणुकीला एक वर्ष झाले. बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना स्थापन केली त्या शिवसेनेच्या पाठीवर खंजीर खुपसण्याला एक वर्ष झाली. विश्वासघाताला एक वर्ष झाले. अनेक उचापती करून महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार स्थापन झालेल्या सरकारला एक वर्ष झाली. सकस फक्त चाळीस आमदार झाले. तसंच, राज्य अनेक संघर्षातून जात आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेपासून बेरोजगारीपर्यंत अनेक प्रश्न आहेत. या राज्यातील महिला अजिबात सुरक्षित नाही. आज फसवणुकीची जयंती पुढल्या वेळेला फसवणुकीची पुण्यतिथी असेल,” असं राऊत म्हणाले.