Sanjay Raut : शरद पवार त्यांच्या हयातीत देखील भाजपसोबत; राऊत यांनी थेट अजित पवार यांना झापलं
सध्या राज्याच्या राजकारणात शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीमुळे भूकंप येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार यांनी काका पवार यांची भेट घेऊन केंद्राची ऑफर दिल्याचे बोलले जाऊ लागले आहे.
नागपूर : 16 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीने सध्या राजकारण चांगलेच तापलेलं आहे. पुण्यात एका उद्योगपतीच्या घरात झालेल्या गुप्त बैठकीवरून सध्या मविआत देखील संभ्रम बनलेला आहे. तर शरद पवार यांना केंद्रात कृषीमंत्री पदाची ऑफर देण्यात आल्याचा दावा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यांच्या दाव्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका करताना बोचरा सवाल केला आहे. राऊत यांनी यावर विचोरलेल्या प्रश्नावर अजित पवार एवढे मोठे कधी झाले की ते शरद पवार यांना ऑफर देऊ लागले आहेत. त्यांच्यात आणि शरद पवार यांच्यात नक्कीच कौटुंबिक नाते साहजिकच आहे. पण शरद पवार हे त्यांच्या हयातीत तरी भाजपबरोबर जाणार नाहीत असा विश्वास देखी राऊत यांनी व्यक्त केला आहे.