Sanjay Raut News : भाजपने तमाशा चालवला आहे, देशात तणाव पसरवणंच त्यांच काम; राऊतांची भाजपवर टीका
Sanjay Raut Press Conference : शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज भाजपवर निशाणा साधत भाजपला देशात फक्त तणाव निर्माण करायचा असल्याचं म्हंटलं आहे.
महाराष्ट्रातील आणि देशातील हालत तुम्हीच बघा. हिंदूस्थानात हिंदू आणि मुस्लीम अशी दोन राज्य बघायला मिळत आहेत. देश विभाजणाकडे जात आहे. नेहरू म्हणाले होते भारताचा पाकिस्तान होऊ देणार नाही. काही लोक महाराष्ट्र पेटवायला निघाले आहेत. कोकणात कधीही दंगली घडल्या नव्हता. मोहन भागवत कधीही महागाई आणि बेरोजगारी यावर बोलत नाहीत. आम्ही लोकांच्या पोटावर बोलतो तुम्ही हिंदूत्वावर बोलता, अशी टीका शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी आज भाजपवर केली आहे.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, देशात तणाव पसरवणे भाजपाचे काम आहे. भाजपात नवहिंदुत्व सुरू झालंय. महाराष्ट्रातील मंत्री इफ्तार पार्ट्यांना विरोध करत आहेत. राज्यात दोन वर्षात ३ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्याबद्दल सरकार बोलत नाहीये, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे कोणीही लक्ष देत नाहीये. पाकिस्तानच्या निर्मितीवेळी काही लोकांनी अशीच स्थिती निर्माण केली होती. देशात तणाव पसरवणे हे भाजपाचे काम आहे.