भाजपा – शिंदेंनी गुंडांना निवडणूक निरीक्षक नेमलंय, संजय राऊत यांची सनसनाटी टीका

| Updated on: Nov 09, 2024 | 5:24 PM

भाजपा आणि शिंदे गटाने निवडणूका जिंकण्यासाठी अंडरवर्ल्डची मदत घेतली असून निवडणूकीचे निरीक्षक म्हणून चक्क गुंड टोळ्यांना नेमल्याचा धक्कादायक आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

भाजपा आणि एकनाथ शिंदे यांनी निवडणूक निरीक्षक म्हणून अंडरवर्ल्डच्या गुंडांना नेमलेले आहे असा सनसनाटी आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. गुंड टोळ्यांच्या प्रमुखांवर निवडणूकांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ठाणे, पुणे, नाशिक या ठिकाणी निवडणूकीवर लक्ष ठेवण्यासाठी गुंड टोळ्याचे प्रमुख नेमलेले आहेत या संदर्भात राज ठाकरे यांनी खरेतर आवाज उठवला पाहीजेत असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. या संदर्भात शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांनी संजय राऊत यांनी त्या गुंडाची नावे जाहीर करावीत. जनतेच्या फायद्यासाठी अशी बातमी गुंड टोळ्याच्या नावासर वृत्तपत्रास प्रसिद्ध करायला हवी, सामना वृत्तपत्र कशासाठी आहे. संजय राऊत यांनी अशी नावे सामनात प्रसिद्ध करावी, उगाच बेछुट आरोप करण्यात काही अर्थ नाही असेही संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.

Published on: Nov 09, 2024 05:13 PM
नरेंद्र मोदी यांनीच महाराष्ट्राला ‘एटीएम’ बनवले, नाना पटोले यांची टीका
मोदींच्या ‘एक है तो सेफ है’ घोषणेवर संजय राऊतांची टीका, म्हणाले की तुमच्या येण्याने…