‘जरांगेंचा बोलवता धनी कोण ? ही माहीती…,’ संजय राऊत यांनी केली मागणी

| Updated on: Feb 26, 2024 | 3:42 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्वारकेत स्कुबा डायव्हींग केले आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की कदाचित त्यांच्या प्रचाराचा तो भाग असेल. विकासाचा मुद्दा कुठे आहे. त्यांचे अनुकरण आता देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी डायव्हींग करुन करावे लागेल. अजित पवारांनी विकासासाठी जात आहे असे पत्र लिहीले होते. अजित पवार बहुदा धरणात उडी मारतील असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

मुंबई | 26 फेब्रुवारी 2024 : मनोज जरांगे पाटील यांच्या मागचा बोलवता धनी कोण आहे ? हे जर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहीती नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. हे सर्व घडविणारे कोण आहेत ? ते राज्य सरकारचा हिस्सा आहेत का ? त्यांना अस्थिरता निर्माण करुन काही वेगळे राजकारण करायचे आहे का? याची देवेंद्रना माहीती नसेल तर मग गृहमंत्री पद तुमच्याकडे गोट्या खेळायला आहे का ? अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. जरांगेबाबत काही माहीती हवी आहे तर जरांगे यांचे फोन टॅप केले असतीलच त्याबाबती डीजी रश्मी शुक्ला अनुभवी आहेत असाही टोला त्यांनी लगावला आहे. जरांगे हे साधे कार्यकर्ते आहेत. गावाकडील नेते आहेत. त्यांच्या भाषेकडे दुर्लक्ष करा. त्यांच्या भावना समजून घ्या असेही संजय राऊत म्हणाले. या राज्यात भाषेची संस्कृती आणि संस्कार जर कोणी बिघडवला असेल तर तो फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या एका टोळीने बिघडवला आहे असाही आरोप त्यांनी केला.

Published on: Feb 26, 2024 03:40 PM
WITT Global Summit : दूध, घर किंवा ब्युटी प्रॉडक्ट्स… स्टार्टअप्समुळे अशी बदलतेय भारताची ओळख
WITT Global Summit : अमूल दूध क्यों पीता है इंडिया? अमूलच्या MD जयेन मेहता यांनी सांगितला यशामागचा ‘X’ फॅक्टर