Special Report | आधी संजय राऊत,आता आदित्य ठाकरे टार्गेटवर

| Updated on: Jul 26, 2022 | 11:52 PM

मुंबई : शिवसंवाद यात्रेतून आदित्य ठाकरेंनी(Aditya Thackeray) बंडखोरांवर निशाणा साधला. शिवसेनेत बंडखोरी केलेल्या नेत्यांवर गद्दार हा टॅग लावला. आणि शिवसेना फोडण्यासाठी भाजपलाच जबाबदार धरलं. त्यानंतर आदित्य ठाकरे हे केंद्र सरकारच्या रडारवर आले आहेत. काऱण आदित्य ठाकरेंनी पर्यावरण खात्यात केलेल्या कामांचं ऑडिट करण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतलाय. सध्या केंद्र सरकारकडून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील कारभाराचं ऑडिट […]

मुंबई : शिवसंवाद यात्रेतून आदित्य ठाकरेंनी(Aditya Thackeray) बंडखोरांवर निशाणा साधला. शिवसेनेत बंडखोरी केलेल्या नेत्यांवर गद्दार हा टॅग लावला. आणि शिवसेना फोडण्यासाठी भाजपलाच जबाबदार धरलं. त्यानंतर आदित्य ठाकरे हे केंद्र सरकारच्या रडारवर आले आहेत. काऱण आदित्य ठाकरेंनी पर्यावरण खात्यात केलेल्या कामांचं ऑडिट करण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतलाय. सध्या केंद्र सरकारकडून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील कारभाराचं ऑडिट सुरु आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, ठाणे, रायगड विभागातील कार्यालयात हे ऑडिट सुरु करण्यात आलंय. यानंतर इतर विभागीय कार्यालयांचंही ऑडिट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या निर्णयावर शिवसेना नेत्यांनी आक्षेप घेतलाय. आदित्य ठाकरेंच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळत असल्यानंच जाणूनबुजून हा निर्णय घेतल्याचा आरोप शिवसेना नेत्यांनी केलाय.

Published on: Jul 26, 2022 11:52 PM
Special Report | आगामी निवडणुकीत धनुष्यबाणाचं चिन्ह गोठणार?
Special Report | रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकरांची पुन्हा दोस्ती?