संजय राऊत यांनी दिला शिंदे गटाला थेट धमकीवजा इशारा, म्हणाले, सापडला तर…
कोकणचा दौरा संपवून आताच मातोश्रीवर आमची बैठक झाली. चिन्ह कोणते मिळावे याची चर्चा सुरु आहे. त्या चोरांचे आम्ही वस्त्रहरण करणार आहोतच. पण, चोरी कुणी केली आणि त्याचा आनंद भाजप साजरा करत आहे.
मुंबई : राज्यात ठिकठिकाणी मंदिरावर दरोडे पडत आहेत. कळस चोरीला जात आहेत, मुर्त्या चोरीला जात आहेत. त्याचप्रमाणे आमच्याही मंदिरातील धनुष्यबाण चोरीला गेला आहे. संशयित चोर कोण आहेत, त्या चोरीत कोण कोण सामील आहेत त्याची चौकशी करू. त्याची माहिती लवकरच जनतेसमोर आणू. सोबतच त्यांचा सरदार कोण आहे त्याचा खुलासा करणार आहे, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. कोकणचा दौरा संपवून आताच मातोश्रीवर आमची बैठक झाली. चिन्ह कोणते मिळावे याची चर्चा सुरु आहे. त्या चोरांचे आम्ही वस्त्रहरण करणार आहोतच. पण, चोरी कुणी केली आणि त्याचा आनंद भाजप साजरा करत आहे. आज उद्धव ठाकरे यांचे गाडीवरचे भाषण ऐकून बाळासाहेबी यांची आठवण झाली. शिवसैनिक संतापला आहे. चोर हातात सापडला तर लोक रस्त्यावर पकडून धडा शिकविल्याशिवाय रहाणार नाही तशीच अवस्था या चोरांची होणार आहे असा धमकीवजा इशाराही त्यांनी दिला.