इंडियाच्या खासदारांचे शिष्टमंडळ मणिपूरला जाणार; संजय राऊत यांनी दिली दौऱ्याची माहिती
मणिपूरच्या घटनेवरून संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ सुरु आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी निवेदन देण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे आता विरोधकांनी थेट मणिपूर गाठण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नवी दिल्ली, 28 जुलै 2023 |मणिपूरच्या घटनेवरून संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ सुरु आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी निवेदन देण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे आता विरोधकांनी थेट मणिपूर गाठण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपकडून मणिपूरचा प्रश्न गांभीर्याने घेत नाही आहे. मणिपूरच्या हिंसाचारावर सगळीकडे चर्चा होते पण भारतच्या संसदेत चर्चा होत नाही. पंतप्रधान मणिपूरमध्ये का जात नाहीत?, यामागे काय राजकारण आहे? शिवसेनेसह देशातील विरोधी पक्षांचं (इंडियाचं) एक शिष्टमंडळ तिथं जाणार आहे. या दौऱ्याचं नेतृत्व मल्लिकार्जुन खरगे करणार आहेत. ठाकरे गटाच्या वतीने तिथे अरविंद सावंत जाणार आहेत.
Published on: Jul 28, 2023 12:38 PM