एका कॅबिनेट मंत्र्याच्या घरी पहाटे ईडीचे लोक येतात, घेऊन जातात…’ राऊतांची प्रतिक्रिया
महाविकास आघाडीतील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांची ईडीने (ED) आज पहाटेपासूनच चौकशी सुरू केल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि संघर्ष तीव्र होणार असल्याचा अंदाज व्यक्त होतोय.
मुंबईः महाविकास आघाडीतील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांची ईडीने (ED) आज पहाटेपासूनच चौकशी सुरू केल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि संघर्ष तीव्र होणार असल्याचा अंदाज व्यक्त होतोय. या चौकशीवर शिवसेना खासदार संजय राऊत एक इशारा देत प्रतिक्रिया दिलीय. राऊत म्हणाले की, मलिक असतील किंवा आमच्यासारखे खूप लोक आहेत. जे सातत्याने बोलत आहेत. असत्याचा पर्दाफाश करत आहेत. मुखवटे उखडून काढत आहेत. त्यांच्यामागे हे ईडी, सीबीआय वगैरे लावलं जातंय. मलिकांची चौकशी होईल. आम्ही वाट पाहतोय. नक्कीच ते संध्याकाळी घरी येतील. महाराष्ट्राच्या एका कॅबिनेट मंत्र्याला, घरी येऊन घेऊन जातात, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
Published on: Feb 23, 2022 11:37 AM