‘ते पळपुटे नाहीत’, संजय राऊत यांचा नक्की कोणावर निशाना?
याचदरम्यान राज्याच्या राजकारण तसेच शरद पवार गटात पुन्हा मोठा भूकंप होणार अशा चर्चा रंगल्या होत्या, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि त्यांच्याबरोबर असणारे काही आमदार हे सत्तेत जाणार अशी चर्चा सुरू होती.
मुंबई, 7 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडून आता महिना होत आहे. यादरम्यान शरद पवार यांना अनेक नेत्यांनी साथ सोडत अजित पवार यांच्यात गटात जाणं पसंत केलं आहे. याचदरम्यान राज्याच्या राजकारण तसेच शरद पवार गटात पुन्हा मोठा भूकंप होणार अशा चर्चा रंगल्या होत्या, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि त्यांच्याबरोबर असणारे काही आमदार हे सत्तेत जाणार अशी चर्चा सुरू होती. त्यावरून ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. त्यांनी जयंत पाटील आणि आमचे डीएनए एकसारखे असून आम्ही पळपूट आणि डरपोक नाही असे म्हटलं होतं. तसेच राऊत यांनी अजित पवार यांचे 2024 ला ही कौतूक करा असा टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लगावला होता. त्यानंतर आता राऊत यांनी जयंत पाटील यांच्यावरून कोणावर निशाना साधला अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
Published on: Aug 07, 2023 12:06 PM