सत्यपाल मलिक यांच्या भेटी मागचं कारण काय? संजय राऊत यांनी सांगितलं…
Sanjay Raut : खासदार संजय राऊत आणि जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यात भेट; पाहा व्हीडिओ...
नवी दिल्ली : शिवसेना ठाकरेगटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भेट घेतली. या भेटीनंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भेटी मागदरम्यान कोणत्या बाबींवर चर्चा झाली ते सांगितलं. राज्यातील देशातील काही घडामोडींवर चर्चा केली. ही सदिच्छा भेट होती, असं राऊत म्हणालेत. सत्यपाल मलिक यांनी राष्ट्रीय सुरक्षा संदर्भात काही माहिती समोर आणलीय. त्यांनी पुलवामा बाबत परखड सत्य सांगितलं आहे. भविष्यात परिवर्तन कसं आणता येईल त्यात त्यांचे योगदान यावर चर्चा झाली, असंही राऊत म्हणाले. सत्यपाल मलिक यांना महाराष्ट्रात यायचं आहे. हा दौरा लवकरच होईल, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
Published on: Apr 27, 2023 02:44 PM