‘…तर बुबुळं बाहेर येतील’; राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल
शिंदे-फडणवीस सरकारकडून यावरून ठाकरे गटावर टीका केली जात आहे. याचदरम्यान ‘चोर मचाये शोर’ म्हणतं भाजपकडून ठाकरे गटावर हल्लाबोल करण्यात आला आहे. तर भाजप, शिंदे गट आणि आरपीआयकडून ठाकरे गटाच्या विरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र तो आता रद्द करण्यात आल्याचं मुंबई भाजपचे अध्यक्ष अशिष शेलार यांनी सांगितलं आहे.
मुंबई : मुंबई महानगर पालिकेसह राज्यात सुरू असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या भ्रष्टाचार आणि मनमानी कारभाराविरोधात ठाकरे गटाकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. यावरून शिंदे-फडणवीस सरकारकडून यावरून ठाकरे गटावर टीका केली जात आहे. याचदरम्यान ‘चोर मचाये शोर’ म्हणतं भाजपकडून ठाकरे गटावर हल्लाबोल करण्यात आला आहे. तर भाजप, शिंदे गट आणि आरपीआयकडून ठाकरे गटाच्या विरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र तो आता रद्द करण्यात आल्याचं मुंबई भाजपचे अध्यक्ष अशिष शेलार यांनी सांगितलं आहे. याचदरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी, यावरून भाजपवर तिखट प्रतिक्रिया देताना टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी, मुंबई भाजपची ही नौटंकी आहे. त्यांच्याकडे दिशा नाही. तर हिम्मत असेल तर त्यांनी निवडणुका घेऊन दाखवावी. म्हणजे शोर कोण माजवतय आणि चोर कोण आहे? हे कळेल असं आव्हान दिलं आहे. तर आजचा हा मोर्चा पाहून सत्ताधाऱ्यांच्या डोळ्याची बुबुळ बाहेर येतील असंही त्यांनी म्हटलं आहे.