Video : आदित्य ठाकरे अयोध्येला कधी जाणार?, संजय राऊत म्हणतात…
राज्याच्या राजकारणात सध्या हिंदुत्व आणि अयोग्या दौऱ्याचं राजकारणच चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 5 जून रोजी अयोध्या यात्रेची घोषणा केलीय. मनसेकडून त्यासाठी जय्यत तयारीही करण्यात येत आहे. मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी एक खास रेल्वेचं बुकिंग करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. दुसरीकडे युवासेनेचे अध्यक्ष आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya […]
राज्याच्या राजकारणात सध्या हिंदुत्व आणि अयोग्या दौऱ्याचं राजकारणच चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 5 जून रोजी अयोध्या यात्रेची घोषणा केलीय. मनसेकडून त्यासाठी जय्यत तयारीही करण्यात येत आहे. मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी एक खास रेल्वेचं बुकिंग करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. दुसरीकडे युवासेनेचे अध्यक्ष आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे देखील अयोध्या दौरा करणार आहेत. मे महिन्याच्या सुरुवातीला त्यांचा दौरा होऊ शकतो असा अंदाज वर्तवला जातोय. आदित्य ठाकरे यांनीच त्याबाबत संकेत दिले आहेत. तर आज शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्यात एक बैठकही पार पडली. त्यानंत बोलताना अयोध्या शिवसेनेसाठी नवीन नाही. ती आमची पायवाट आहे, असा टोला संजय राऊतांनी मनसेला लगावलाय.