चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ‘त्या’ आरोपांवर संजय राऊत म्हतात, “हे छपन्न, अठावन्न लोक ठाकरेंबद्दल खोटं बोलतात”
उद्धव ठाकरे यांनी आपल्या मेळाव्यात पुन्हा एकदा अमित शाह यांनी मुख्यमंत्री पदाचा शब्द पाळला नाही असा पुनरुच्चार केला. याच पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आरोपा केला. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या विदर्भ दौऱ्यात भाजपवर सडकून टीका केली आहे. “भाजप नेते अमित शाहांनी शब्द पाळला असता तर भाजप आणि शिवसेनेचे मुख्यमंत्री अडीच-अडीच वर्षे सत्तेत असते. मात्र, शाहांनी शब्द फिरवला”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. याला प्रत्युत्तर म्हणून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंवर आरोप केले. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “उद्धव ठाकरे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. पोहरादेवीपासून त्यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. त्यांनी पोहरादेवीची शपथ घेऊन जे काही सांगितलं ते खरं आहे. भाजप नेते खोटं बोलले म्हणून आज महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांनी वेगळं राजकारण केलं नाही. हे छपन्न-अठ्ठावन्न लोक खोटं सांगत आहेत.”