एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर संजय राऊत यांची तीन शब्दात प्रतिक्रिया दिली; म्हणाले…

| Updated on: Mar 27, 2023 | 11:09 AM

Sanjay Raut on CM Eknath Shinde and Raj Thackeray Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलंय. ते नेमकं काय म्हणालेत? पाहा...

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात काल भेट झाली. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलंय. मुख्यमंत्र्यांनी काल राज ठाकरे यांची भेट झाली. ही भेट म्हणजे सदू आणि महादूची भेट असल्याचं संजय राऊत म्हणालेत. बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात आम्हाला सदू महादूचा धडा होता. तशी भेट होती. शिंदे आणि राज ठाकरे कदाचित जुने मित्र असतील किंवा नव्याने प्रेम उफाळून आले असेल, म्हणून ही भेट झाली असावी. मालेगावच्या सभेनंतर त्यांच्या भावना उफाळून आल्या असतील. त्यामुळे एकमेकांच्या अश्रू पुसायला भेटले असतील, असं संजय राऊत म्हणालेत.

Published on: Mar 27, 2023 11:07 AM
तीनच गाणे पण शिट्ट्या? इंदोरीकर महाराजांचा गौतमी पाटीलवर निशाणा
राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी; अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस