आम्ही राजकीय शत्रूच पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा- संजय राऊत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ते काय म्हणालेत पाहा...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना सर्वच स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभेचे विरोधा पक्षनेते अजित पवार यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शिवसेना ठाकरेगटाचे नेते संजय राऊत यांनीही एकनाथ शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “एकनाथ शिंदे हे आमचे राजकीय शत्रूच आहेत. ते कधी बदलणार नाही. पण एखाद्याचा वाढदिवस असेल तर त्याला शुभेच्छा देण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यामुळे मी एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो”, असं संजय राऊत म्हणालेत.
Published on: Feb 09, 2023 11:25 AM