पाळीव कुत्रं, भाकरी अन् मालक; एका वाक्यात संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर थेट निशाणा

| Updated on: Feb 18, 2023 | 11:29 AM

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह दोन्ही शिंदेगटाला मिळालं आहे. निवडणूक आयोगाने काल संध्याकाळी हा निर्णय दिला. त्यावरून ठाकरेगटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय. पाहा...

कणकवली : ठाकरेगटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय. पाळीव कुत्रं, भाकरी अन् मालकाचं उदाहरण देत त्यांनी शिंदेंवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे. पाळीव कुत्र्याने भाकरी पळवली म्हणून मालक भिकारी होत नाही, असं म्हणत राऊतांनी एकनाथ शिंदेंवर थेट निशाणा साधलाय. शिवसेनेची मालकी निवडणूक आयोगातील पोपटरावांनी ठरवली. सर्व पक्षांनी एकत्र येत निवडणूक आयोगाला प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे, असंही राऊत म्हणालेत.

Published on: Feb 18, 2023 10:53 AM
उद्धव ठाकरे तुम्ही स्वत:चा पक्ष काढा; शिंदेगटातील मंत्र्याचा सल्ला
कितीही दबाव आणा, आम्ही फिनिक्स पक्षासारखी भरारी घेणारच; ठाकरेगटातील नेत्याने कार्यकर्त्यांमध्ये जान भरली…