एकनाथ शिंदेंना कुणी मुख्यमंत्री मानायला तयार नाही; संजय राऊतांचा घणाघात
शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. तसंच भाजपवरही निशाणा साधलाय. पाहा...
मुंबई : शिवसेना ठाकरेगटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. एकनाथ शिंदेंना कुणी मुख्यमंत्री मानायला तयार नाही, असं संजय राऊत म्हणालेत. तसंच तपास यंत्रणा, सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगवरून संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग भाजपने विकत घेतलंय का?, असा सवाल त्यांनी विचारलाय. ते माध्यमांशी बोलत होते.
Published on: Feb 13, 2023 10:56 AM