पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण निवडणूक आयोगाने शिंदेंना दिला, पण ‘ही’ एक गोष्ट देण्याचा त्यांना अधिकार नाही- संजय राऊत

| Updated on: Mar 05, 2023 | 10:42 AM

Sanjay Raut : काश्मीरी पंडीतांच्या हत्येचं सत्र सुरूच पण भाजपचा एकही नेता तिथे गेला नाही, असं म्हणत शिवसेना ठाकरेगटाचे खासदार संजय राऊत आक्रमक झाले. ते माध्यमांशी बोलत होते. पाहा...

मुंबई : शिवसेना ठाकरेगटाचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोग आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं खरं. पण उद्धव ठाकरे यांच्यावर असणारं लोकांचं प्रेम, लोकांचे आशिर्वाद आणि लोकांना पाठिंबा निवडणूक आयोग एकनाथ शिंदेंना देऊ शकत नाही. त्यांना तो अधिकार नाही, असं संजय राऊत म्हणालेत. काश्मीरी पंडीतांची हत्या सुरू आहे . त्यांचा आजही आक्रोश सुरू आहे. भाजपचा एकही नेता गेला नाही, असंही संजय राऊत म्हणालेत.

Published on: Mar 05, 2023 10:29 AM
आजपासून भाजप-शिवसेनेच्या आशीर्वाद यात्रेला सुरुवात; रॅलीची सुरुवात कुठून? पाहा…
सुप्रियाताई, पवारसाहेबांचं तत्व तुम्ही पाळायला हवं, एवढा पुरोगामीपणा बरा नव्हे; कुणाचा टोला?