एकनाथ शिंदे, सत्ता आज आहे उद्या नसेल, ‘ती’ चूक तुम्हाला लवकरच कळेल!; राऊतांचा टोला
भगवा रंग तर आम्हाला प्रिय आहेच. मात्र कोणत्याही रंगाची मक्तेदारी कोणाकडेही नाही. सर्व रंग हे निसर्गाने दिलेले आहेत. शिवसेना प्रमुखांनी आम्हाला भगव्यावर प्रेम करायला शिकवलं. त्यामुळे भगवा आम्हाला प्रियच आहे, असं राऊत म्हणालेत.
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. एकनाथ शिंदे तुमच्याकडे आज सत्ता आहे, उद्या नसेल. भाजप तुमचा वापर करतं आहे. तुम्हाला कळेल की तुम्ही किती चूक केली आहे, असं संजय राऊत म्हणालेत. सत्तेचा गैरवापर करत ठाण्यातील शाखा ताब्यात असाल तर ते मुख्यमंत्रिपदाला हे शोभणारं नाही. हा शुभ संदेश मी मुख्यमंत्र्यांना देतोय, असंही राऊत म्हणालेत. माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
Published on: Mar 07, 2023 11:31 AM