“…हा उद्धव ठाकरे यांच्या कामाला डाग लावण्याचा प्रयत्न”, संजय राऊत यांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका
कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांना अटक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नवी दिल्ली, 21 जुलै 2023 | कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांना अटक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “कोव्हिड सेंटर घोटाळा हे नाटक आहे.कोरोनाच्या वेळी उद्धव ठाकरेंनी उत्तम काम केले आहे. त्या काळात कोव्हिड सेंटरमध्ये कोणताही घोटाळा झालेला नाही. मात्र, ठाकरेंनी कोरोना काळात केलेल्या कामाला डाग लावण्याचा प्रयत्न आहे.आम्हाला बदनाम करत आहेत. तुम्ही किती बदनाम आहात ते आधी सांगा.”
Published on: Jul 21, 2023 01:20 PM