“एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार नाहीत”, संजय राऊत यांचा फडणवीस यांच्यावर निशाणा; म्हणाले, “सूर्य…”

| Updated on: Jul 25, 2023 | 11:45 AM

येत्या 10 ऑगस्टच्या आसपास एकनाथ शिंदे यांच्या पक्षांतरा बाबादचा निर्णय होईल आणि त्यानंतर मुख्यमंत्रीपद अजित पवार यांना देण्यात येईल," असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. यावर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहणार असं म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नवी दिल्ली, 25 जुलै 2023 | येत्या 10 ऑगस्टच्या आसपास एकनाथ शिंदे यांच्या पक्षांतरा बाबादचा निर्णय होईल आणि त्यानंतर मुख्यमंत्रीपद अजित पवार यांना देण्यात येईल,” असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. यावर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहणार असं म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “आम्ही जेव्हा म्हणतो की, एकनाथ शिंदे हे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी राहणार नाहीत तेव्हा आमचं बोट सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याकडे आहे. सर्वोच्च न्याालयाने दिलेले जे निर्देश आहेत ते जर विधानसभा अध्यक्षांनी पाळले. तंतोतंत त्याचं पालन केलं तर देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्यात काही तथ्य राहात नाही. ते देवेंद्रजी यांनाही पक्क माहिती आहे. पण…”, संजय राऊत नेमकं काय म्हणाले यासाठी हा व्हिडीओ पाहा…

Published on: Jul 25, 2023 11:45 AM
‘एक राखी सैनिकांसाठी’ हा उपक्रमातून इगतपुरी येथील विद्यार्थिनींकडून सैनिकांना सलाम
लोढा यांच्या कार्यालयावरून ठाकरे गटाच्या नेत्याचा टोला, ‘दुर्दैवाने, त्या कार्यालयात कार्यकर्ते माजी नगरसेवक’