“शिवसेना का फुटली याची दंतकथा फडणवीस सांगतात”, संजय राऊतांचा हल्लाबोल

| Updated on: Jun 20, 2023 | 7:00 AM

शिवसेना फुटीवर भाजपच्या वतीने नवीन नवीन गौप्यस्फोट केला जात आहे. कधी देवेंद्र फडणवीस म्हणतात उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेल्याने आम्ही त्यांचं दुकान बंद केलं तर कधी चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्री पद आदित्य ठाकरे यांना द्यायचा अंतर्गत प्लान होता. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मुंबई : शिवसेना फुटीवर भाजपच्या वतीने नवीन नवीन गौप्यस्फोट केला जात आहे. कधी देवेंद्र फडणवीस म्हणतात उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेल्याने आम्ही त्यांचं दुकान बंद केलं तर कधी चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्री पद आदित्य ठाकरे यांना द्यायचा अंतर्गत प्लान होता. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “शिवसेनेचे लोक का फुटले याची दंतकथा फडणवीस सांगतात. दुसरी कथा चंद्रशेखर बावनकुळे सांगतात आणि तिसरंचं काहीतरी प्रवचन अमित शाह झोडत असतात. राम कथा एकच पाहिजे. हे सगळे कथावाचक आहेत. एकत्र बसा तुम्ही आणि ठरवा की नक्की लोकांना कोणत्या कथेतून मुर्ख बनवायचं आहे. पण लोक मुर्ख बनणार नाहीत. समुद्र फार खवळतो, नाकातोंडात पाणी जातं आणि मग गटांगळ्या खाव्या लागतात. आम्हाला समुद्र जास्त मिळतो. आम्ही मुंबईत राहतो. विदर्भात समुद्र नाही. नद्याही सुकल्या आहेत. आग आणि पाण्याशी खेळू नका. अशा प्रकारची पोरखड वक्तव्य ही सामाजिक हितासाठी चांगली नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणं एकवेळ परवडेल पण मेहबूबा मुफ्तीबरोबर जाणं हे देशाला परवडणार नाही,” असं संजय राऊत म्हणाले.

Published on: Jun 20, 2023 07:00 AM
“राष्ट्रवादीला मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री आदित्य ठाकरे, म्हणून…,” बावनकुळेंनी सांगितलं शिवसेना फुटीचं कारण
‘न्यूज अरेना इंडिया’च्या सर्व्हेचा डबल धमाका! राज्यात भाजपच अव्वल तर मुख्यमंत्री म्हणून पसंती कोणास?