आदल्या दिवशी फडणवीस धमकी देतात अन् दुसऱ्या दिवशी पत्रकाराची हत्या, याचा संबंध काय?; राऊतांचा सवाल
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय.पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या हत्येवरही त्यांनी भाष्य केलंय. राऊत काय म्हणालेत? पाहा...
शिवसेना ठाकरेगटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय. पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या हत्येवरही त्यांनी भाष्य केलंय. विशेषत: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदल्या दिवशी रिफायनरी प्रकल्पाला कोण आडवा येतो ते पाहू…, असं म्हटलं. दुसऱ्याच दिवशी या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या पत्रकार शशिकांत वारिसे यांची हत्या झाली. याचा एकमेकांशी काय संबंध आहे? हा योगायोग आहे की आणखी काही?, असं संजय राऊत म्हणालेत. वारिसे यांच्या हत्येचा संबंध मागच्या 25 वर्षात कोकणात झालेल्या हत्यांशी आहे, असंही राऊत म्हणालेत.
Published on: Feb 11, 2023 11:05 AM