देवेंद्र फडणवीस यांच्या ‘या’ भूमिकेचं संजय राऊत यांच्याकडून स्वागत; म्हणाले…
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेचं समर्थन केलंय. काय म्हणाले पाहा...
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेचं समर्थन केलंय. कटूता संपावी, असं फडणवीसांचं एक विधान मी ऐकलं आणि वाचलं होतं. आम्ही त्याचं स्वागत केलं, महाराष्ट्रात इतक्या टोकाच्या कटूतेचं आणि द्वेषाचं राजकारण झालं नव्हतं. राजकीय मतभेद होत असतात, महाराष्ट्रात ज्या पद्धतीचं राजकारण शिजतंय ते योग्य नाही. फडणवीस म्हणतायत त्याप्रमाणे ते कटुता संपवण्याचं नेतृत्व करत असतील त्याचं स्वागत आहे, असं संजय राऊत म्हणालेत.