सर्वोच्च न्यायालय शेवटचा आशेचा किरण, पण…; सत्तासंघर्षाबाबत संजय राऊत यांचं महत्वाचं वक्तव्य

| Updated on: Mar 16, 2023 | 1:05 PM

Sanjay Raut on Maharahstra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊतांनी नेमकं काय म्हटलंय? पाहा...

नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद सुरु आहे. या सुनावणीवर शिवसेना ठाकरे गटाचे ने, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सत्तासंघर्षावरील युक्तिवाद संपू द्या.त्यानंतरच त्यावर बोलणं उचित राहिल, असं संजय राऊत म्हणालेत. लोकशाही वाचवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. सर्वोच्च न्यायालय हे तर शेवटचा आशेचा किरण आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाकडून आम्हाला अपेक्षा आहेत. आम्हाला न्यायाची अपेक्षा आहेत, असंही राऊत म्हणालेत. विरोधकांची चौकशी केली जाते मगे गौतम अदानींची चौकशी का नको? शेकडो, हजारो कोटींचा देश बुडवणाऱ्याxची चौकशी का नको?, असा सवाल राऊतांनी विचारला आहे.

हे सर्व सरकार मधली लोक घडवत आहेत, राजन साळवी यांचा घणाघात
फोनवर फोन अन् मेसेजचा भडीमार; अमृता फडणवीस यांना 1 कोटींची लाच ऑफर