आम्ही नव्या राज्यपालांना ‘तो’ सल्ला दिला तर भाजपला मिरच्या का झोंबाव्यात?- संजय राऊत

| Updated on: Feb 13, 2023 | 11:18 AM

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे नवे राज्यपाल रमेश बैस यांना सल्ला दिलाय. याबाबत त्यांनी ट्विट केलंय. पाहा...

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे नवे राज्यपाल रमेश बैस यांना सल्ला दिलाय. त्याचसोबत भाजपवर निशाणा साधलाय. याबाबत त्यांनी ट्विट केलंय. “महाराष्ट्राला नवे राज्यपाल मिळाले. आनंद आहे.राज्यपालांनी घटनेनुसार काम करावे.राजभवनाचे भाजप कार्यालय करु नये, असे मत व्यक्त होताच भाजपास मिरच्या का झोंबाव्यात? राज्याने कटू अनुभव घेतला आहे.राज्यपाल महाराष्ट्राला मिळाले फक्त भाजपाला नाही. याचे भान ठेवले तरी पुरे!”, असं संजय राऊत ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

Published on: Feb 13, 2023 11:18 AM
पुणे न्यूज, व्हॅलेंटाईन डेसाठी ११ लाख गुलाब दाखल
‘ही’ कृष्णमूर्ती पाहून भले भलेही म्हणतील काय आहे हे ? काय आहेत वैशिष्ठये ? पाहा व्हिडिओ