“नारायण राणे आणि किरीट सोमय्या भाजपचे पोपट, निव्वळ भन्नाट-बिनबुडाचे आरोप करतात”
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार टीका केलीय. पाहा काय म्हणालेत...
नवी दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार टीका केलीय. “काही स्वतःला नेते समजतात. नारायण राणे आणि किरीट सोमय्या यांना मी भाजपचे पोपट म्हणतो. ते भन्नाट , बिनबुडाचे आरोप करतात. राणे म्हणतात मी खासदार केलं, मग बाळासाहेब ठाकरे त्यावेळी काय करत होते? 2004 साली मी सामना संपादक होतो. मी 25 वर्ष मतदान करत होतो. मी बांग्लादेशी-पाकिस्तानी नागरिक आहे का? मी याच देशात राहतो. महाराष्ट्र राज्याचा मी नागरिक आहे, असं संजय राऊत म्हणालेत.
Published on: Feb 03, 2023 10:26 AM