नितीन देसाई मृत्यूप्रकरणी संजय राऊत यांचा भाजपावर निशाणा; म्हणाले, “बँक बुडवणाऱ्यांची कर्जमाफी होते, पण…”
प्रसिद्ध कला-दिग्दर्शक नितीन देसाई यांनी काल आत्महत्या केली. नितीन देसाई यांच्यावर जवळपास व्याजासह 250 कोटींचं कर्ज झालं होतं. हे कर्ज फेडू न शकल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नितीन देसाई यांच्या आत्महत्येवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
नवी दिल्ली, 03 ऑगस्ट 2023 | प्रसिद्ध कला-दिग्दर्शक नितीन देसाई यांनी काल कर्जत येथील एनडी स्टुडिओतआत्महत्या करत आपलं जीवन संपवलं. नितीन देसाईंच्या जाण्याने देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. नितीन देसाई यांच्यावर जवळपास व्याजासह 250 कोटींचं कर्ज झालं होतं. हे कर्ज फेडू न शकल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. परंतु, नितीन देसाई यांच्या आत्महत्येवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “दुर्दैवी आहे, नितीन देसाईंसारखा कला दिग्दर्शक ज्यांनी हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आपल्या कतृत्त्वाचा ठसा कष्टाने आणि मेहनतीने उमटवला. या देशातील सर्वात उत्तम स्टुडिओ त्यांनी कर्जतमध्ये उभा केला होता. लगानपासून जोधा अकबरपर्यंत अशा अनेक चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली, अशा महान कलाकाराला मृत्यूला कवटाळावं लागलं. एका बाजूला देशातून हजारो कोटी रूपये घेऊन अनेकजण बँकांना बुडवून पळत आहेत. जे भाजपसोबत आहेत त्यांची कर्ज माफ होत आहेत आणि कारवाईही होत नाही. मात्र…”, संजय राऊत नेमकं काय म्हणाले यासाठी पाहा हा व्हिडीओ…