मोदीजी, हिंमत असेल तर आज बेळगावात मराठीतून भाषण करून दाखवा; ‘या’ नेत्याचं ओपन चॅलेंज
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज बेळगावमध्ये रोडशो होणार आहे. या रोड शोआधी शिवसेना ठाकरेगटाचे नेते, खासदास संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ओपन चॅलेंज दिलं आहे. पाहा...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज बेळगावमध्ये रोडशो होणार आहे. राणी चन्नम्मा चौकातून रोड शोला सुरूवात होणार आहे. या रोड शोआधी शिवसेना ठाकरेगटाचे नेते, खासदास संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ओपन चॅलेंज दिलं आहे. या संदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे. “मोदीजी ज्या राज्यात जातात तिथे स्थानिक भाषेत भाषणाला सुरूवात करतात. आज मराठी भाषा गौरव दिनी, पंतप्रधान बेळगावात आहेत. बेळगावात मराठीत भाषणाला सुरुवात करून त्यांनी मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या तर मराठी जनांना अभिमान वाटेल ! कर्नाटक सरकारला एक कडक संदेश जाईल. पहा जमतंय का!”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
Published on: Feb 27, 2023 03:06 PM