आज कसब्यात टरबूज फुटल्याचं मला कळालं; संजय राऊत यांचा निशाणा कुणावर?
Kasba by Election 2023 : शिवसेना ठाकरेगटाचे खासदार संजय राऊत यांनी कसबा पोटनिवडणुकीवर भाष्य केलंय. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केलंय. पाहा...
मुंबई : शिवसेना ठाकरेगटाचे नेते संजय राऊत यांनी कसबा पोटनिवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात आता वनवा पेटला आहे. आज कसब्यात टरबूज फुटल्याचं मला कळालं, असं म्हणत टीका केली आहे. हे बोलताना त्यांचा रोख नेमका कुणाकडे होता, याची सध्या चर्चा होतेय. शिवसेना राहणार बाकी सगळ्यांवर सर्जिकल स्ट्राइक जनताच करणार, ही जनतेची प्रतिक्रिया आहे. कसब्यातील सगळ्या पेठा कोसळल्या. शिंदेगट सुद्धा त्यांना वाचवू शकला नाही. आमच्या खांद्यावर बसवून यांनी भाजपला वाढवलं, असंही संजय राऊत म्हणालेत.
Published on: Mar 02, 2023 02:53 PM