“विधानसभा अध्यक्षांकडून न्यायाची अपेक्षा नाही, कारण…”, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितलं
शिवसेनेतील 16 आमदारांच्या अपात्रेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना नोटीस दिली आहे. या नोटिशीचे उत्तर दोन आठवड्यात देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई: शिवसेनेतील 16 आमदारांच्या अपात्रेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना नोटीस दिली आहे. या नोटिशीचे उत्तर दोन आठवड्यात देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “विधानसभा अध्यक्षांकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा नाही. कारण, ते राजकीय पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम करतात. संविधान, घटना, कायदा, नियम हे सर्व समोर आहेत. तरी पदावर असलेली व्यक्ती डोळ्यावर राजकीय पक्षाचे झापड बांधून बसली आहे. मग ते राज्यपाल, पंतप्रधान, संसदेचे अध्यक्ष किंवा विधानसभा असो न्याय करत नाहीत.”
Published on: Jul 14, 2023 03:41 PM