मनसे कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख; संजय राऊत म्हणाले…
महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री राज ठाकरे या आशयाचा मजकूर असलेला बॅनर सेनाभवनासमोर लावण्यात आलं आहे. त्यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहा...
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज गुढीपाडव्यानिमित्त जाहीर सभा घेणार आहेत. या सभेआधी शिवसेनेचं मुख्यालय असणाऱ्या दादरच्या शिवसेनाभवन समोर मनसेच्या वतीने बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री राज ठाकरे या आशयाचा मजकूर आहे. या बॅनरची सध्या चर्चा होतेय. त्यावर ठाकरेगटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आपल्या देशात लोकशाही आहे. त्यामुळे कुणीही मुख्यमंत्री होऊ शकतो. आमचा लोकशाहीवर विश्वास आहे. ज्याच्याकडे बहुमत असेल तो मुख्यमंत्री होईल. पण बहुमत हे चंचल असतं. आज त्यांच्याकडे बहुमत असेल उद्या आमच्याकडे असेल, असंही राऊत म्हणालेत.
Published on: Mar 22, 2023 12:06 PM