शशिकांत वारिसेंच्या हत्येचा मुद्दा लावून धराल तर तुमचीही तीच अवस्था करू, अशी मला धमकी- संजय राऊत

| Updated on: Feb 11, 2023 | 11:02 AM

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय. आपल्याला धमकी आल्याचं त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. पाहा...

मुंबई : शिवसेना ठाकरेगटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या हत्येवरून शिंदे सरकारवर टीका केली आहे. तसंच आपल्यालाही धमकी आल्याचं संजय राऊत म्हणालेत. “मलाही धमकीचा फोन आला होता. शशिकांत वारिसे यांच्या हत्येचा मुद्दा लावून धराल तर तुमचीही तीच अवस्था करू, अशी धमकी मला आली आहे. पण असल्या धमक्यांना मी घाबरत नाही”, असं संजय राऊत म्हणालेत.

Published on: Feb 11, 2023 10:30 AM
…म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार मुंबईत येताहेत; शरद पवार यांचं टीकास्त्र
फडणवीसांच्या सभेनंतर दुसऱ्याच दिवशी शशिकांत वारिसे यांची हत्या, याचा अर्थ काय? संजय राऊत सवाल