Video : “आम्ही मविआतून बाहेर पडायला तयार, तुम्ही मुंबईत या”, संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंना आवाहन

| Updated on: Jun 23, 2022 | 3:20 PM

गेल्या तीन दिवसांपासून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे गटानं ताणून धरलेल्या विषयात आता शिवसेना (Shivsena) बॅकफूटवर गेल्याचं दिसून येतंय. अनैसर्गिक आघाडी नको, असा आग्रह धरणाऱ्या एकनाथ शिंदेंचं म्हणणं शिवसेना मान्य करायला तयार आहे, असं वक्तव्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे. महाराष्ट्रात सुरु असलेल्या घडामोडीमध्ये संजय राऊत यांचं हे वक्तव्य अत्यंत महत्त्वपूर्ण […]

गेल्या तीन दिवसांपासून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे गटानं ताणून धरलेल्या विषयात आता शिवसेना (Shivsena) बॅकफूटवर गेल्याचं दिसून येतंय. अनैसर्गिक आघाडी नको, असा आग्रह धरणाऱ्या एकनाथ शिंदेंचं म्हणणं शिवसेना मान्य करायला तयार आहे, असं वक्तव्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे. महाराष्ट्रात सुरु असलेल्या घडामोडीमध्ये संजय राऊत यांचं हे वक्तव्य अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. “आम्ही मविआतून बाहेर पडायला तयार, तुम्ही मुंबईत या”, असं आवाहन संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंना केलं आहे.

Published on: Jun 23, 2022 03:16 PM
Video : ‘त्या’ सुटकेचा थरार, Kailas Patil यांनी सांगितला ‘तो’ कटू अनुभव
Video : सरकार वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील- जयंत पाटील