‘वाघ निघाले गोरेगावला!”, शिवसेनेच्या पोस्टरबाजीवर संजय राऊतांची टीका, म्हणाले, “वाघाचे कातडे घालून लांडगे…”
उद्या शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. या दिनानिमित्त दोन्ही गटाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. या वर्धापनदिनानिमित्त शिंदे यांच्या शिवसेनेकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे.‘वाघ निघाले गोरेगावला’ असं या पोस्टरवरती उल्लेख करण्यात आला आहे. या पोस्टरवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.
मुंबई : उद्या शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. या दिनानिमित्त दोन्ही गटाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. या वर्धापनदिनानिमित्त शिंदे यांच्या शिवसेनेकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे.‘वाघ निघाले गोरेगावला’ असं या पोस्टरवरती उल्लेख करण्यात आला आहे. या पोस्टरवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, “मिंधे गटाचे काही पोस्टर मी येताना पाहिले. वर्धापन दिनाला वाघ निघाले गोरेगावला,असं त्या पोस्टरवर लिहिलं होतं. त्यांना कोणीतरी सांगायला पाहिजे, मराठी चुकलंय तुमचं. ‘वाघाचे कातड पांघरून लांडगे निघाले गोरेगावला’ असं त्यांनी करायला पाहिजे”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
Published on: Jun 18, 2023 12:36 PM