पहाटेच्या शपथविधीसाठी मी फडणवीसांचे आभार मानतो; संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
खासदार संजय राऊत यांनी पहाटेच्या शपथविधीवर भाष्य केलंय. त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे आभार मानलेत. पाहा...
नाशिक : खासदार संजय राऊत यांनी पहाटेच्या शपथविधीवर भाष्य केलंय. महाविकास आघडीचं सरकार येऊ नये. म्हणून पहाटे शपथ घेतली होती. पण पहाटेच्या शपथविधीमुळे कोंडी फुटली. पहाटेच्या शपथविधीबाबत पवारांना माहिती होते की नाही मला माहित नाही. पण कोंडी फुटायला शपथविधीने मदत झाली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे आभार मानतो. त्यांनी कोडी फुटायला मदत केली, असं संजय राऊत म्हणालेत. ते नाशिकमध्ये बोलत होते.
Published on: Feb 22, 2023 03:59 PM