शुभांगी पाटील यांचा पक्षप्रवेश झाला आता लवकरच मोठी जबाबदारी; संजय राऊतांचे संकेत
शुभांगी पाटील यांनी हाती शिवबंधन का बांधलं? संजय राऊत यांनी कारण सांगितलं. संजय राऊत म्हणाले...
नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांनी शिवसेनेच्या ठाकरेगटात प्रवेश केलाय. त्यांच्या या पक्ष प्रवेशावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शुभांगी पाटील नाशिक मतदार संघातून अत्यंत झुंजारपणे निवडणूक लढल्या. फार थोडा मताने त्यांचा पराभव झाला. त्याला पराभव म्हणता येणार नाही. त्यांची लढाई अत्यंत महत्त्वाची होती. त्यांनी आज शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला आहे.पक्ष आणि उद्धव ठाकरे लवकरच त्यांच्यावर महत्वाची जबाबदारी देतील, असं संजय राऊत म्हणालेत.