“अजित पवारांनी ‘ती’ यादी लवकरच जाहीर करावी”; मुंबई लोकलमधील अत्याचार प्रकरणावर संजय राऊत म्हणतात…
मुंबईत धावत्या लोकलमध्ये एका 40 वर्षीय व्यक्तीने लोकल ट्रेनमध्ये 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धावत्या मुंबई लोकल ट्रेनच्या लेडीज डब्यात आरोपीने मुलीवर बलात्कार केला. या प्रकरणावर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सरकारवर टीका केल्यानंतर त्याला ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी दुजोरा दिला.
नवी दिल्ली : मुंबईत धावत्या लोकलमध्ये एका 40 वर्षीय व्यक्तीने लोकल ट्रेनमध्ये 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धावत्या मुंबई लोकल ट्रेनच्या लेडीज डब्यात आरोपीने मुलीवर बलात्कार केला. या प्रकरणावर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सरकारवर टीका केल्यानंतर त्याला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दुजोरा दिला आहे. “अजित पवारांनी परखडपणे सांगितलंय की या सरकारला कायदा आणि सुव्यवस्था याकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये. परीक्षेला निघालेल्या एका मुलीवर ट्रेनमध्ये असे अत्याचार होत असतील, तर ज्यांच्यावर या सगळ्यांच्या रक्षणाची जबाबदारी आहे, ते राज्याचे गृहमंत्री काय करतायत? कुठे आहेत पोलीस? की पोलीस फक्त ४० गद्दार बेईमान आमदारांच्या संरक्षणासाठीच ठेवलेले आहेत? अजित पवारांनी जाहीर केल्याप्रमाणे, ठाण्यात १००हून जास्त असे लोक आहेत ज्यांनी फक्त मिंधे गटात प्रवेश केला म्हणून त्यांच्या रक्षणासाठी किमान एक हजार पोलीस लावले आहेत. कुणाची भीती वाटतेय तुम्हाला? अजित पवारांनी ही यादी लवकरच जाहीर करावी. आम्हीही या यादीची वाट पाहात आहोत,”असं संजय राऊत म्हणाले. “कृषी खात्यात प्रचंड घोटाळा आहे. तो पाहिला तर मला शेतकऱ्यांची आणि कृषी खात्याची दया येते. बोगस धाड करणारे त्यांचीच माणसे आहेत. याप्रकरणी मुख्यमंत्री काहीच करणार नाही. ते मंत्री आणि आमदारांचेच मिंधे आहेत”, असंही राऊत म्हणाले.